महाराष्ट्र

Uday Samant : उदय सामंत यांनी घेतली आंदोलक रुग्णसेविकांची भेट; म्हणाले...

उदय सामंत यांनी आझाद मैदान येथे आंदोलन करण्याऱ्या रुग्णसेविकांची भेट घेतली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

उदय सामंत यांनी आझाद मैदान येथे आंदोलन करण्याऱ्या रुग्णसेविकांची भेट घेतली आहे. भेट घेतल्यानंतर उदय सामंत म्हणाले की, शासनाची भूमिका त्यांच्यापर्यंत आणून पोहचवली आहे. त्यांच्या मागण्या ज्या रास्त होत्या त्यांना न्याय देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी मला पाठवलं होते.

त्यांच्या योग्य मागण्यांना न्याय देण्याची भूमिका ही आम्ही घेतलेली आहे. मी त्यांना विनंती केलेली आहे की, शासन तुमच्यासोबत आहे. त्याच्यामुळे आपण आपलं आंदोलन थांबवावे. मागच्यावर्षी 3 हजार रुपये त्यांच्या मानधनामध्ये वाढवण्यात आले होते.

यासोबतच ते म्हणाले की, आता 2 हजार रुपये वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांच्या प्रसूतीसाठीची जी रजा आहे ती देखील देण्याचा निर्णय महानगरपालिकेनं घेतला आहे. 5 लाखाच्या विमामध्ये त्यांना बसवण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की, सरकार महिला भगिनींच्याबाबतीमध्ये अतिशय सकारात्मक आहे. असे उदय सामंत म्हणाले.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी