महाराष्ट्र

“लवकरच राज्यभरात प्राध्यापकांची भरती होणार”

Published by : Lokshahi News

महाराष्ट्रात लवकरच प्राध्यापकांची भरती होणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. याचसोबत तासिका प्राध्यापकांचे मानधन वाढवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील प्राध्यापकांची भरती रखडलेली होती. मात्र, आता हायकवार कमीटीने प्राध्यापक भरतीला मान्यता दिली असून संबंधित फाईल वित्त विभागाडे गेली आहे. तिला दोन-तीन दिवसांत मंजुरी मिळेल. त्यानंतर पहिल्या टप्प्याच्या प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल, तर तासिका प्राध्यापकाच्या मानधनात वाढ करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली.

गोंदियात पत्रत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी ही माहिती दिली. विद्यापीठाच्या परीक्षा रद्द होणार नसून त्या ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.

संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू; विविध विधेयकांवर होणार निर्णय

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर; मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार?

Latest Marathi News Updates live: सरकार स्थापनेबाबत दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत आज चर्चा होणार

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड