चिपळूणमधील पूरबाधित लोकांना तातडीची मदत म्हणून 10 हजारांपैकी 5 हजार रुपये उद्यापासून खात्यात जमा होणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. पुराने बाधित झालेल्या नागरिकांना तत्काळ दिलासा देण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.
चिपळूण शहरातील लोकमान्य टिळक स्मारक आणि संग्रहालयाला मंत्री उदय सामंत यांनी 50 लाखांचा निधी जाहीर केला आहे. चिपळूण आणि रत्नागिरीतील बाधित ग्रंथालयांनाही तातडीची 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आल्याची माहिती सामंत यांनी दिली आहे.