महाराष्ट्र

कासवासाठी विहिरीत तिघांची उडी; स्रियांनी साड्यांनी बनविला दोर,पण...

लाखनी तालुका गढपेंढरी येथे ही घटना घडली आहे

Published by : Shweta Shigvan-Kavankar

उदय चक्रधर| भंडारा : येथे तीन तरुण विहिरीत कासवांना पकडण्यासाठी उतरले होते. यापैकी दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर एकाला वाचवण्यात यश आले. महिलांनी अंगावरच्या साड्या सोडून एकाला वाचवलं. लाखनी तालुका गढपेंढरी येथे ही घटना घडली आहे.

शेतात रोवणी सुरू असतांना जवळ असलेल्या पडक्या विहिरीत मजुरांना कासव दिसला. तेथील तीन पुरुष कासव काढण्यासाठी विहिरीत उतरले. मात्र, विहिरीत गॅस असल्याने तिन्ही मजुरांचा जीव गुदमुरू (कासावीस) लागला. हा सर्व प्रकार मजूर महिलांना लक्षात येताच त्यांनी ओरडा-ओरड केली. मात्र, त्यांना वाचविण्यासाठी कोणत्याही प्रकारचे साहित्य नसल्याने मजूर महिलांनी स्वतःच्या अंगावरच्या साड्या काढून त्यांचा दोर करून विहिरीत फेकले. त्यातील एकाचे प्राण वाचविण्यात यश आले. तर दोन मजूर पुरुषांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, पावसाळ्याचे दिवस असल्याने शेती कामांना वेग आलेच तर ग्रामीण भागात धान रोवणी सुरू आहे. धान रोवणीसाठी मजूर मिळत नसल्याने इतर गावातील मजूर आणले जातात. अशातच गढपेंढरी येथील अशोक गायधने या शेतकऱ्यांने स्वतःचे शेतातील रोवणीसाठी लाखनी तालुक्यातील भूगाव मेंढा येथील जवळपास पंधरा जण हुंडा (गुता) ते पुरुष व स्रियां रोवणीसाठी आणले होते.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी