महाराष्ट्र

सांगलीच्या म्हैसाळ कालव्यात दोन तरुणांचा बुडून मृत्यू

आयुष्य हेल्पलाईन टीमच्या जवानांकडून म्हैसाळ योजनेच्या कालव्यात बुडालेल्या तरुणांचा शोध सुरू आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

संजय देसाई | सांगली : सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडग येथे म्हैसाळ योजनेच्या मुख्य कालव्यात तिघे तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे. ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे यातील एका तरुणाला वाचविण्यात यश आले आहे. मात्र, अन्य दोघे तरुण वाहून गेले आहेत. आयुष्य हेल्पलाईन टीमच्या जवानांकडून म्हैसाळ योजनेच्या कालव्यात बुडालेल्या तरुणांचा शोध सुरू आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सलमान शौकत तांबोळी (वय 21) आणि आरमान हुसेन मुलाणी (वय 16) अशी वाहून गेलेल्यांची नावे आहेत. तर नदीम फिरोज मुलाणी (वय 18) असे वाचविण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, माधवनगर येथे राहणारे संबंधित तिघे तरुण हे छोटा हत्ती टेम्पो चालक आहेत. मंगळवारी दुपारी एक भाडे घेऊन ते बेडग येथे आले होते. भाडे सोडून झाल्यानंतर सदर तिघेजण बेडग येथील म्हैसाळ जलसिंचन योजनेच्या मुख्य कालव्यात पोहण्यासाठी उतरले. मात्र, पाण्याचा वेग प्रचंड असल्याने सदर तिघेही तरुण वाहून गेले.

तरुण पाण्यात बुडल्याचे दिसताच काही ग्रामस्थांनी तातडीने यातील नदीम मुलाणी नामक तरुणाला वाचविले. मात्र, सलमान शौकत तांबोळी आणि आरमान हुसेन मुलाणी हे दोघे तरुण वाहून गेले. त्यांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. वाचविलेल्या तरुणाला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिरज ग्रामीण पोलीस आणि आयुष्य हेल्पलाईन टीमच्या जवानांकडून पाण्यात बुडालेल्या तरुणांचा शोध सुरू आहे.

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...