महाराष्ट्र

वनविभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना लाच घेताना अटक; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कारवाई

वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या तक्रारदारावर कारवाई न करण्याच्या मोबदल्यात लाच घेणाऱ्या सातपूर वनविभागाचा वनपरिमंडळ अधिकारी व वनरक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (ता.२१) २० हजारांची लाच घेताना पकडले होते.

Published by : shweta walge

नाशिकच्या वनजमिनीच्या जागेत अतिक्रमण करून हॉटेल व्यवसाय थाटल्याच्या आरोप करीत तडजोडी अंती २० हजारांची लाच स्वीकारताना एसीबी पथकाने दोघांना रंगेहात पकडल्यामुळे खळबळ उडलीये.

शैलेंद्र आनंद झुटे (वय ४८) व साहेबराव बाजीराव महाजन (वय ५४) अशी लाच घेणाऱ्या संशयितांची नावे आहे. झुटे वनपरिमंडळ अधिकारी, तर महाजन वनरक्षक या पदावर कार्यरत आहेत. सातपूर वनविभाग कार्यालयात दोघांची नेमणूक असून, ते वर्ग ३ अधिकारी आहेत. ४८ वर्षीय हॉटेल व्यावसायिकाने याबाबत तक्रार दिली होती. तक्रारदाराचे हयात दरबार नावाचे हॉटेल असून, वनविभागाच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण करून अवैधरित्या हॉटेलचे बांधकाम केल्याचा दावा संशयितांनी केला होता. त्यामुळे तक्रारदाराने संशयितांची भेट घेतली असता त्यांनी गेल्या दहा वर्षांपासून अतिक्रमित जागेवर व्यवसाय करीत असल्याबाबत धमकी देऊन हा व्यवसाय यापुढेही सुरू ठेवायचा असेल, तर एक लाख रुपयांची लाच मागितली.मात्र, त्यानंतर तडजोडीअंती ६० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती.

तक्रारदाराने एवढे पैसे नसल्याचा बनाव केल्याने हा व्यवहार तीस हजार रुपयांवर मान्य करण्यात आला होता. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला होता. पथकाने पडताळणी करून मंगळवारी सापळा लावला असताना ठरलेल्या रकमेपैकी २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोघांना रंगेहात पकडण्यात आले. दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी देखील देण्यात आली आहे.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय