महाराष्ट्र

अंबरनाथच्या चिखलोली धरणात दोन मुलं बुडाली

Published by : Lokshahi News

मयुरेश जाधव | अंबरनाथच्या चिखलोली धरणात दोन लहान मुलं बुडाल्याची घटना घडलीये. या मुलांचा अद्यापही शोध लागू शकलेला नाही. अंधार पडल्यानं शोधकार्य थांबलं, मुलं अद्याप बेपत्ताच

सार्थक ओमले आणि महादेव मिस्त्री अशी या दोघांची नावं असून ते अंबरनाथ पूर्वेच्या महालक्ष्मी नगर टेकडी परिसरात वास्तव्याला आहेत. शालेय विद्यार्थी असलेले हे दोघे आज रविवार असल्यानं चिखलोली धरणात पोहण्यासाठी गेले होते. मात्र तिथे पाण्याचा अंदाज न आल्यानं हे दोघे बुडाले. याबाबतची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बोटीच्या आणि हुकच्या साहाय्याने या दोन मुलांचा शोध सुरू केला. मात्र दिवसभर शोध घेऊनही हे दोघे सापडू शकले नाहीत. अखेर अंधार पडल्यानं आजचं शोधकार्य थांबवण्यात आलं असून, पुन्हा शोधकार्य सुरू केलं जाणार असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा