महाराष्ट्र

यवतमाळ शिकाऊ डॉक्टरच्या खून प्रकरणी दोघांना अटक

Published by : Lokshahi News

संजय राठोड, यवतमाळ | यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिकाऊ विद्यार्थी डॉक्टरची हत्या करण्यात आली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात हत्या झाल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. डॉ. अशोक पाल, असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. खून प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी दिली.

खुनाचा गुन्हा दाखल होताच दोन जणांना अटक करण्यात आली. 30 ऑगस्ट रोजी झालेल्या वादाची किनार या खुनामागे आहे. इतर आरोपींच्या शोधासाठी चार पथके रवाना केली आहे. घटनेच्या दिवशी साडेआठ वाजता अशोक पालच्या मोबाइलवर एक फोन आला होता. तो उत्तर प्रदेशातून होता. आता तो बंद आहे. या संपूर्ण प्रकाराच्या चौकशीसाठी सायबर सेल कामाला लागली आहे.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती