महाराष्ट्र

अबब!!! भंडारा जिल्ह्यात एकाच घरी मिळाले बारा नाग

नाग जातीचे साप पकडण्यात सर्प मित्राला यश

Published by : Shweta Shigvan-Kavankar

उदय चक्रधर | भंडारा : जिल्ह्यातील एकाच घरात तब्बल 11 नाग (Snake) आढळून आले आहेत. यामुळे घरमालकाची चांगलीच घाबरगुंडी उडाली होती. नाग जातीचे 11 पिल्ले व एक मादी साप पकडण्यात सर्प मित्राला यश आले आहे. याची माहिती गावात पसरताच बघ्यांनी एकच गर्दी केली होती.

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील पवनारा येथे विलास रामेश्वर कावळे यांच्या राहत्या घरी नाग जातीचे 11 पिल्ले व एक मादी आढळल्याने एकच खळबळ उडाली. हे दृश्य पाहण्यासाठी एकच गर्दी उसळली होती. यानंतर तातडीने तुमसर येथील सर्पमित्र यांना पाचारण करण्यात आले. त्यांच्या शोधमोहिमेत दीड फुट लांब लगभग तीन दिवसांची १1 पिल्ले व 5 फुट लांब मादी साप पकडण्यात यश आले आहे.

मुलांनो खांद्यावर बसून नदी पार करा अन् शाळेत जा...सरकार आपलं ऐकणार नाही..सर्व नाग जातीचे विषारी साप असून यात न्यूरोटॉक्झीम विष असल्याचे सर्प मित्रांनी सांगितले. तर, पिल्लांची संख्या जास्त असू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला. त्यानुसार घर मालकाला लक्ष ठेवण्याविषयी सांगण्यात आले आहे. मादी सापाने स्वयंपाक घरात एक खोलगट खड्डा आढळून आल्याने यात अंडे दिल्याचे भाकित करण्यात आले असून लगभग ३०ते ३५ अंडे असण्याची शक्यता आहे. दरम्यान, सर्व सापांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले आहे.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result