महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आज आंब्याची आरास मांडण्यात आली. तुळजापूर येथे आपल्या शेतात आलेल्या आंब्याची आरास देवी पुढे मांडण्याची परंपरा आहे. देवीचे पुजारी धनंजय पाटील दरवर्षी न चुकता ही पूजा देवीसमोर मांडतात यावेळी देवीला भक्तांनी अर्पण केलेलं आंबे प्रसाद म्हणून ठेवण्यात आले, तुळजाभवानी मंदिर भक्तांना दर्शनासाठी बंद आहे. त्यामुळे देवीच्या भक्तासाठी मांडण्यात आलेल्या या पूजेचे ऑनलाइन प्रक्षेपण करण्यात आले आहे.