मुंबई नाशिक महामार्गावर विल्होळी गावाजवळील डोंगरबाबा मंदिराजवळ ट्रक ड्रायव्हरचा ताबा सुटल्याने भीषण अपघात झालाय.
विल्होळी गावातील एका महिला आशासेविका उषा गडाख आणि त्यांचे पती रामदास गडाख अंत्यविधीसाठी जात असताना मुंबईकडून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने धडक दिली.
यामध्ये मोटरसायकलवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून ट्रकचालकला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सध्या पुढील तपास तालुका पोलीस स्टेशन करत आहे.