गोरेगावच्या आरे कॉलनीत वृक्षतोड झाल्यावर शिवसेना भाजपावर तुटून पडली होती. मात्र, आता सत्तेत असलेल्या ठाकरे सरकारच्या काळात मालाडच्या दानापाणी भागात मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शिवसेना केवळ पर्यावरणप्रेमी असल्याचा आव आणते का? अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यावर आता कांदळवनांची कत्तल म्हणजे मुंबईवर नवीन संकट असून हा फौजदारी गुन्हा, तात्काळ काम थांबवलं पाहिजे अशी जोरदार टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
मालाडमधील दानापाणी या भागात पर्यटकांची कायमच गर्दी असते. त्यामुळे हा भाग पर्यटकांच्या दृष्टीने विकसित करण्यात यावा, यात दुमत नाही. मात्र, विकासाच्या आडून इथे वृक्षांची कत्तल होत असेल तर हा सरकारचा दुटप्पीपणा आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. एवढंच नाही तर या ठिकाणी वृक्षतोड करताना परवानगी घेतली आहे का? कोणाच्या आदेशाने ही कारवाई होते आहे? लोकांना पडलेल्या आशा अनेक प्रश्नानाची ठाकरे सरकार उत्तर देणार का हे पाहणं महत्वाच आहे.
तसेच मालाडमधील दानापाणीतील वृक्षतोड थांबवण्यासाठी सेव्ह मालाड संस्थेचं राज्यपालांना पत्रातून मागणी केली आहे.