महाराष्ट्र

पुणे शहर पोलीस दलातील निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

Published by : Lokshahi News

पुण्यातील फुकट बिर्याणीचं प्रकरण गाजत असतानाच शहराच्या पोलीस दलात अंतर्गत बदल करण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक अभय महाजन यांची बद्दल गुन्हे शाखेच्या युनिट 3 मध्ये करण्यात आली आहे. तर, युनिट- 3 चे पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे यांच्याकडे दरोडा व वाहन चोरी पथके यांचा पदभार देण्यात आला आहे.

दरोडा व वाहन चोरी पथकाच्या पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांच्याकडे तांत्रिक विश्लेषण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. यासोबतच त्यांच्याकडे सामाजिक सुरक्षा शाखेची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर यांच्याकडे गुन्हे शाखेच्या युनिट 4 ची जबाबदारी देण्यात आली आहे.

तर यापूर्वी युनिट चार मध्ये कार्यरत असणारे रजनिष निर्मल यांच्याकडे प्रशासन विभागाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. भरोसा सेलचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्याकडे तपास व अभियोग सहाय्यक पक्षाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी