नागपुरात एका कार चालकानं वाहतूक पोलिसाला चक्क गाडीवरुन ओढत फरफटत नेल्याचा प्रकार समोर आला आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान जिवाची पर्वा न करता कार चालकासमोर पोलिसानं दाखवलेल्या धाडसाचंही कौतुक केलं जातंय.
नागपूरच्या रामदासपेठ भागातील कॅनल रोड इथं वाहतूक पोलीस कारवाई करत होते. त्यावेळी एका कारला थांबवण्याचं आवाहन पोलिसांनी केलं. कार चालकावर कारवाई करत असताना बेशिस्त कार चालकानं वाहतूक पोलिसाच्या अंगावरच गाडी घातली. बोनेटवर बसलेल्या या पोलिसाला कार चालकानं वेगान फरफटत नेलंय. संतापलेल्या काही जागृक नागरिकांनी कारचा दुचाकीनं आणि कारनं पाठलाग गेला. त्यानंतर कार चालकाला गाडी थांबवणं भाग पाडलं. अखेरीस कार चालकाची गाडी थांबल्यानंतर वाहतूक पोलिसाला गाडीच्या खाली उतरवण्यात आलं. दोघांनी दुचाकीवरुन कारला ओव्हरटेक करत ब्लॉक केलं आणि पर्यायानं कार चालकांना गाडी थांबवण्याशिवाय पर्याय उरला नाही. यानंतर कार चालकावर पोलिसांनी कायदेशीर कारवाईदेखील केली. कार चालकाला ताब्यात घेण्यात आलं असून पोलीस याप्रकरणी आता पुढील कारवाई करत आहेत. दरम्यान जिवाची पर्वा न करता कार चालकासमोर पोलिसानं दाखवलेल्या धाडसाचंही कौतुक केलं जातंय.