आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत व्यापारी वर्गाला काहीसा दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र महाविकास आघाडी सरकारकडून व्यापाऱ्यांना कुठलाही दिलासा देण्यात आला नाही. त्यामुळे राज्यभरातील व्यापारी आक्रमक झाले आहेत.
कोल्हापुरातील व्यापाऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळत आहे. व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीची गरज नाही. मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी संध्याकाळपर्यंत निर्णय घ्यावा. अन्यथा शुक्रवारपासून कुठल्याही परिस्थितीत दुकानं उघडणार. मग पोलीस किंवा आर्मी आली तरी पर्वा नाही, अशी आक्रमक भूमिका महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे ललित गांधी यांनी मांडली आहे.