टूलकिट प्रकरणात बीडच्या शंतनू मुळूक याला अटकपूर्व जामीन मिळाला आहे. त्यामुळे त्याला अटकेपासून दिलासा मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हा निर्णय दिला. तसेच मुंबईतील वकील निकीता जेकब हिच्या प्रकरणावर उद्या बुधवारी न्यायालयात सुनावणी पार पडेल.
पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने ट्विट केलेल्या टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलिसांनी कारवाई सुरू केली होती. यामध्ये पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवीला अटक केल्यानंतर तसेच मुंबईतील वकील निकीता जेकब आणि मूळचे बीड जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या शंतनू मुळूक यांचं नावही टूलकिट प्रकरणात समोर आले होते. निकीता जेकब आणि शंतनू यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केलं होते. शंतनू यांच्यावर टूलकिट तयार करण्याबरोबरच खलिस्तानवादी समर्थक गटाच्या संपर्कात असल्याचा आरोप आहे.
शंतनू यांनी दिल्ली पोलिसांच्या अटक वॉरंटविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंठपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. या सुनावणीत शंतनू मुळूक याला अटकेपासून दिलासा मिळाला. शंतनू मुळूक याला अटकपूर्व जामीन मिळाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. तसेच मुंबईतील वकील निकीता जेकब हिच्या प्रकरणावर उद्या बुधवारी सुनावणी होणार आहे.