टोक्यो ऑलिम्किमधून जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असणाऱ्या दिपिका कुमारीने जबरदस्त कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरीमध्ये धडक दिली आहे. दीपिका कुमारीने रशियाच्या सेनिया पेरोवाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. दिपिकाने हा सामना ६-५ ने जिंकला.
भारताला तिरंदाजीत दिपिका कुमारीकडून पदकाची अपेक्षा आहे. दिपिका कुमारीला आज उपांत्य फेरीचा सामना खेळावा लागणार आहे. दिपिका कुमारीसोबत अतून दासनेही उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
सकाळी ११.३० वाजता दिपिका उपांत्यपूर्व सामन्यासाठी मैदानात उतरणार आहे. यावेळी तिचा सामना कोरियाच्या एन सेनसोबत होणार आहे. तिरंदाजी हा कोरियाचा आवडता खेळ मानला जातो. यामुळे दिपिकासाठी पुढचा मार्ग खडतर असणार आहे. पण भारतासाठी दिपिका हा खडतर मार्ग पार करत पदक जिंकेल अशी आशा आहे.