महाराष्ट्र

आज “वाचन प्रेरणा दिन”

Published by : Lokshahi News

भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (A. P. J. Abdul Kalam ) यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिन राज्यभरात "वाचन प्रेरणा दिन" ( reading inspiration day ) म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी 15 ऑक्टोंबर हा दिवस शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा केला जातो.  डॉ. कलाम दुर्दम्य इच्छाशक्ती असणाऱ्या आणि ठाम आत्मविश्वासाचे विविध पैलू होते. भारत नक्कीच महासत्ता बनेल, हा विश्वास त्यांनी प्रत्येक भारतीयाच्या मनात निर्माण केला होता. 

भारताची खरी शक्ती ही युवाशक्ती कशी असणार आहे हे त्यांनी सांगितले आहे. डॉ. कलाम यांचे लेखन स्फूर्तीदायी आहे. डॉ. कलाम नेहमी म्हणत असत की, एक चांगले पुस्तक शंभर मित्रांप्रमाणे असते. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांनी डॉ.कलाम यांची पुस्तके वाचावीत, त्याचबरोबर इतर साहित्याचेही जास्तीत जास्त वाचन करावे आणि विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, या दृष्टीने वाचन प्रेरणा दिवसाचे आयोजन शाळा आणि महाविद्यालयांमध्ये करण्यात येत आहे.

मुलांचे लाडके व्यक्तिमत्त्व डॉ. अब्दुल कलाम (A. P. J. Abdul Kalam ) यांना आदरांजली वाहण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांने एक पुस्तक वाचण्याचा संकल्प करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. वाचन प्रेरणा चळवळ होण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना वाचनाचा छंद लागावा, या साठी विविध कार्यक्रम राबविण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. तद्वतच डॉ. कलाम यांच्या किमान एका पुस्तकाचे वाचन शिक्षकांनीही करावे, असेही अभिप्रेत आहे.

२० कोटी पुस्तके वाचनाचा संकल्प

राज्यातील शाळांमध्ये सध्या २ कोटी २५ लाख विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. शाळेतील प्रत्येक मुलाने पुस्तकाचे वाचन करावे, असे उद्दिष्ट ठेवण्याचे निर्देश आहेत.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news