कोरोनामुळे लोककलावंतांसमोर उपासमारीची वेळ आली आहे. या लोककलावंतासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवणार असल्याचे आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.
कोरोनामुळे लोककलावंतांसमोर मोठे संकट उभे केले आहे. या कोरोनामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. असंख्य कलावंत आपली कला सोडून जगण्यासाठी हाताला येईल ते काम करत आहे. अशी भीषण परिस्थिती सध्याची आहे. त्यामुळे लोककलावंतांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रसिध्द गायक- विष्णू शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कलावंतांची बैठक बोलावली होती. या बैठकीत माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे,गायक विश्वजित शिंदे, प्रकाश सोनावणे, मोहन जोशी,तसेच शेकडो लोककलावंत उपस्थित होते. यावेळी कलावंतांना संबोधित करताना नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून प्रश्न सोडवणार असल्याचे आश्वासन उपस्थित कलावंतांना दिले.