महाराष्ट्र

वाळू वाहतूक करणाऱ्या टीप्परची टॅक्सीला धडक;दोन जण गंभीर

Published by : Lokshahi News

अनिल साबळे । सिल्लोड तालुक्यात महामार्गावर वाळू वाहतूक करणाऱ्या टीप्पर व काळी पिवळी टॅक्सी यांच्यात समोरा समोर जोरदार धडक झाल्याची भीषण अपघाताची घटना घडली आहे. या भीषण अपघातात दोन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या जखमींची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे.

चीचखेडा परिसरात औरंगाबाद जळगाव महामार्गावर वाळू वाहतूक करणाऱ्या टीप्पर व काळी पिवळी टॅक्सी यांच्यात समोरा समोर जोरदार धडक झाल्याची भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात काळी पिवळी टॅक्सीचां समोरील भागाचा चुराडा झाला आहे तर वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परचे तीन तुकडे झाले आहे. या भीषण अपघातात दोन जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या जखमींना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारां साठी रवाना करण्यात आले आहे.

अनेक दिवसापासून सिल्लोड तालुक्यात वाळू वाहतूक करणाऱ्या विविध वाहनाचा धुमाकूळ सुरू असून जड मालवाहू टीप्पर, ट्रॅक्टर व मालवाहू ट्रक ने दररोज वाळू वाहतूक तालुक्यातील विविध मार्गा वरून भरधाव वेगाने सुरूच असते. या वेगाने जाणाऱ्या वाहणावर वाहतूक पोलिसाचे लक्ष नसल्याने वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांअभावी अपघाताच्या घटना घडण्याची भीती वाढली आहे. या मार्गावरील वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर पोलिस प्रशासन का? कारवाई करीत नाही असा यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Sankashti Chaturthi 2024: पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीनिमित्त जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ

Supreme Court: सर्वात मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचे YouTube चॅनल हॅक

Ravikant Tupkar: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकर आक्रमक

Wadigodri: वडीगोद्रीत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारेंचं उपोषण

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! पुण्यातून दुबई बँकॉकसाठी विमानसेवा होणार सुरू