महाराष्ट्र

...म्हणून टिकटॉक स्टार लेडी कंडक्टरला केले निलंबित; एसटी महामंडळाचा खुलासा

टिकटॉक स्टार लेडी कंडक्टर निलंबित केल्या प्रकरणी एसटी महामंडळाचा खुलासा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

बालाजी सुवर्से | उस्मानाबाद : कळंबच्या टिकटॉक स्टार लेडी कंडक्टरच्या निलंबन प्रकरणाची राज्यात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. ऑन ड्यूटी रिल्स तयार केल्याने मंगल गिरी या लेडी कंडक्टरला निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईवर सोशल मीडियावर आक्षेप नोंदविण्यात आला. तर, महिला कंटक्टर मंगलनेही माझ्याविरोधात कारस्थान रचले असल्याचा आरोप एसटी महामंडळावर केला. यावर आता एसटी महामंडळाने खुलासा केला आहे.

मंगल गिरी सोशन मीडियावर अ‍ॅक्टीव्ह असून विविध रिल्स शेअर करत असे. यातील एक व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल झाल्याने महिला कंटक्टर अडचणीत आली आहे. तिच्यावर थेट निलंबनाची कारवाई एसटी महामंडळाने केली आहे. मात्र, संपात सहभागी न झाल्याने कारस्थान रचले असून कामावर घेण्यात यावे, अशी मागणी या लेडी कंडक्टरने केली. या प्रकरणी आता उस्मानाबादच्या विभाग नियंत्रकानी खुलासा केला असून या लेडी कंडक्टरने बसच्या ड्राइवर सीटवर बसून व्हिडिओ बनवून बेफिकीरी दाखवल्याने निलंबन केले असल्याचा विभागीय नियंत्रक चेतना केरवडकर यांनी केला आहे.

वाहन हे लोकांच्या सोयीसाठी असते, वाहनात बसून त्यांनी ड्राइवर सीटवर बसून काही व्हिडिओ बनविले आहेत, जर वाहन सुरु झाले असते तर अनुचित प्रकार घडला असता त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांचे वर्तन हे चुकीचे असून त्यांच्या वयक्तिक स्वातंत्र्यावर गदा येईल असे कुठलेच कृत्य केले नसल्याचे ही त्यांनी सांगितले आहे. तर अपल्याविरोधात संपात सहभागी न झाल्याने कारस्थान रचले असून कामावर घेण्यात यावे अशी मागणी या लेडी कंडक्टरने केली आहे

Sharad Pawar Candidate List: काका vs पुतण्या रिंगणात! शरद पवार गटाकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी जाहीर

मोठी बातमी! विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी २० नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर, जयंत पाटील रिंगणात

Maharashtra Assembly Elections : मोठी बातमी! राज्यात विधानसभेच्या मतदानादिवशी सुट्टी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची पहिली यादी जाहीर