महाराष्ट्र

गडचिरोली जिल्ह्यात वाघाची शिकार; वाघ नख्खे काढून पुरले जमिनीत

Published by : Lokshahi News

व्येंकटेश दुडमवार, गडचिरोली | गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली वनविभागातील अंतर्गत येणाऱ्या अहेरी वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. 615 मध्ये 30 डिसेंबर 2021 रोजी गस्तीवर असलेले वनरक्षक कैलाश परचाके, अतुल कातलाम, वनपाल नरेंद्र वड्डेटीवार यांना ओढयालगत दुगंधी येत असल्याने सदर दिशेनी ते गेले असता ओढयाच्या पात्रात रेतीवर वाडलेल्या वृक्षाची फांदी ठेवली होती व त्या ठिकाणी मोठया प्रमाणावर माशा बसलेल्या दिसल्या. सदर बाब त्यांनी उपविभागीय वन अधिकारी, आलापल्ली नितेश शंकर देवगडे यांना दिली. त्यानंतर त्यांनी अहेरी व आलापल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांना सोबत घेऊन मोका स्थळावर दाखल झाले. सदर बाब अहेरीचे पोलीस निरिक्षक श्याम गव्हाने व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तरेश्वर सुरवसे यांना कळविले. व मोक्यावर पाचरण केले.

National Tiger Conservation Authority यांच्या मार्गदर्शक सुचनेच्या अनुषंगाने मोक्यावरती असलेली फांदी बाजुला करुन रेतीत पुरुन असलेले शव बाहेर काढण्याची कार्यवाही केली असता सदर शव हे वाघाचे असल्याचे दिसुन आले. त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तरेश्वर सुरवसे, डॉ. पवन पावळे, डॉ. ज्ञानेवश्वर गव्हाने यांच्या पॅनलने सदर वाघाच्या शवाचे शवविच्छेदन केले. शवविच्छेदनाच्या वेळेस आशिष पांडे भारतीय वनसेवा, उदय पटेल वन्यजीव मानद रक्षक तथा NTCA प्रतिनिधी, लक्ष्मण कन्नाके सरपंच देवलमरी, श्रीनिवास राऊत, अध्यक्ष स.व.स मोसम, जगन्नाथ मडावी, माजी उपसंरपच देवलमरी, दिपक वाढरे निर्सग सखा संस्था (NGO) गोडपिंपरी हे उपस्थित होते.

पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या पॅलने शवविच्छेदन केले असुन सदर शव हे पुर्ण वाढ झालेल्या मादी वाघीनीचे असुन सदर वाघीनीचे शिर धडापासुन वेगळे केले होते व चारही पायाची वाघ नख्खे काढलेली होती. शव पुर्णपणे सडलेल्या अवस्थेत होते. सदर शवाचे विसेरा, हाड, त्वचाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणी करीता पाठविण्यासाठी घेण्यात आले आहे.

मोका स्थळावरील परिस्थितीनुसार मोका स्थळा पासुन अंदाजे 300 मिटर अंतरावर असलेल्या 11 के.व्हि. च्या विद्युत वाहिणी वरुन बाईडींग तारेव्दारे विद्युत प्रवाह वनात अंदाजे 1 किलोमिटर पर्यंत वाहुन नेण्यात आले होते. व सदर तारेच्या स्पर्शाने सदर मादी वाघीनीची शिकार करण्यात आल्याचे शक्यता आहे. सदर शिकार हि 7 ते 10 दिवसा आधी करण्यात आली असावी असा अंदाज आहे. नियमा प्रमाणे सदर मृत मादी वाघीनीचे शव कार्यवाही अंती पंच व NTCA पॅनल समक्ष दहन करण्यात आले.

पुढील तपास गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर, उपवनसंरक्षक आलापल्ली राहुल सिंह टोलीया, उपविभागीय वन अधिकारी नितेश देवगडे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी शिल्पा शिगोन करीत आहे. सदर कार्यवाहीत अहेरी व आलापल्ली वनपरिक्षेत्रातील वनपाल व वनरक्षक यांचा सहभाग आहे.

Lokshahi Marathi Live Update : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावर राहावं-मंत्री उदय सामंत

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती