स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच कायद्याची भाषा आमूलाग्र बदलणार आहे. आज, सोमवारपासून तीन ब्रिटिशकालीन फौजदारी कायदे हद्दपार होत असून त्याजागी भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे तीन नवे कायदे अमलात येत आहेत. यापुढे सर्व फौजदारी गुन्हे नोंदवण्यापासून ते त्यांचा तपास व न्यायालयीन प्रक्रिया नव्या संहितांनुसार राबविली जाईल.
देशात आजपासून तीन नवे कायदे लागू होणार आहेत. ब्रिटिशकालीन फौजदारी कायदे आयपीसी, सीआरपीसी, इव्हिडन्स अॅक्ट हद्दपार होणार आहे. नवीन कायद्यांमुळे न्यायदानाची प्रक्रिया वेगवान होणार आहे. नवीन कायद्यांनुसार फसवणुकीसाठी आता कलम 420 नाही तर 316 लागणार आणि हत्येसाठी कलम 302 ऐवजी 103 कलम लागणार आहेत.
420 हा कलम आपण फसवणुकीसाठी आपण वापरत होतो तो सामन्यांच्या भाषेमध्ये सुद्धा कोणी फसवणुक केली तर 420 हा कलम म्हणायचो पण ता त्या ऐवजी 316 हा कलम लागणार आहे. डिसेंबर 2023 मध्ये संसदेत मंजूर करण्यात आलेले कायदे आजपासून देशभरात लागू होत आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच कायद्याची भाषा आमूलाग्र बदलणार आहे.