Leopard  Team Lokshahi
महाराष्ट्र

Leopard : राहत्या घरात बिबट्याचा तीन तास ठिय्या

लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव/कोहळी येथील घटना

Published by : shamal ghanekar

उदय चक्रधर | भंडारा (Bhandara) - शिकारीच्या शोधात आलेला एक बिबट्या (Leopard ) चक्क वस्तीतील राहत्या घरात घुसून तब्बल 3 तास थैमान घातल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव/ कोहळी येथे घडली. येथील रेवनाथ परशुरामकर यांच्या घरात तब्बल 3 तास ठिय्या मांडला होता.

पिंपळगाव/ कोहळी येथील रेवनाथ विनायक परशुरामकर यांचे घर हे जंगल व शेतीला लागून असलेल्या पिंपळगावात आहे. तर पिंपळगाव हे गाव लाखांदूर अर्जुनी मार्गावर असून लाखांदूर तालुक्यातील शेवटच्या टोकावरील आणि जंगला लगत आहे. त्यामुळे येथे वन्य प्राण्याचा मुक्त संचार नेहमीच पाहायला मिळते. मात्र, शिकारीच्या शोधात असलेला एक बिबट्या येथीलच रेवनाथ परशुरामकर यांच्या घरात शिरला. बिबट्या घरात आल्याचे समजताच सर्वत्र एकच खळबळ उडाली.ही बातमी गावात पसरताच ग्रामस्थांसह तालुक्यातील जनतेने घरात घुसलेल्या बिबट्याला बघण्यासाठी पिंपळगावची वाट धरली.

दरम्यान, येथील काही ग्रामस्थांनी प्रसंगावधान साधून दरवाज्याची बाहेरून कडी लावली आणि बिबट्या घरात जेरबंद झाला. तर त्याला ग्रामस्थांच्या मदतीने जंगलाच्या दिशेने हुसकावून लावण्यात वन विभाग व पोलिस प्रश्नाला यश आले आहे. येथे या बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांनी एकाच गर्दी केली होती

Lokshahi Marathi Live Update : रणजितसिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करा- राम सातपुते

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का