महाराष्ट्र

जिल्हा बँक निवडणुकीवरून समर्थकांकडून धमकीचे फोन – आमदार दीपक केसरकर

Published by : Lokshahi News

सावंतवाडी | जिल्हा बँक निवडणूक प्रकरणात एका समर्थका कडून मला धमकी आली तुम्ही या निवडणुकीत पडू नका, तुमच्या अन्य निवडणुकांत आम्ही तुम्हाला सहकार्य करू, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.मात्र मला काही फरक पडत नाही, माझी भूमिका दहशतवादाच्या विरोधात कायम आहे, असे स्पष्टीकरण आमदार दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिले. दरम्यान "म्याऊ म्याऊ"च्या गोष्टी करणार्‍यांनी जास्त टोकाची भूमिका घेऊ नये, जेलमध्ये वडापाव खायला लावला हे विसरला की काय? असाही टोला यावेळी त्यांनी लगावला.

जिल्हा बँकेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केसरकर व जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा उमेदवार सतीश सावंत यांनी आज याठिकाणी पत्रकार परिषद घेतली. यावेळी दीपक केसरकर म्हणाले, जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला काही समर्थकांकडून धमकीचे फोन आले होते. तुम्ही या निवडणुकीत ढवळाढवळ करू नका, आम्ही तुम्हाला अन्य निवडणुकात मदत करतो, असे त्यांनी सांगितले होते.

परंतु प्रत्यक्षात मी त्यांना धुडकावून लावले. जे फोन आले त्यांचे टीपण माझ्याकडे आहे. मात्र माझा स्वभाव नसल्यामुळे मी त्याला फोन ठेवा, असे सांगून हा विषय त्या ठिकाणी संपवला. परंतु पुन्हा प्रकार झाल्यास माझी पोलिसात तक्रार देण्याची तयारी आहे.

त्याठिकाणी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी ३ लाख रुपयांचे आमिष मतदारांना दाखवले जात आहे. प्रत्यक्षात हे पैसे पाठवायचे आहेत. त्यामुळे बँकेच्या सभासदांनी ते पैसे घेऊ नये आणि चुकीच्या लोकांच्या ताब्यात बँक देऊ नये, असे केसरकर म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज अहमदनगर बंदची हाक

Ashok Saraf: महाराष्ट्राचे लाडके अशोक मामा लवकरच येणार टेलिव्हिजनवर; “या” मालिकेद्वारे येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस; प्रकृती खालावली

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी 'या' दिवशी येणार पुणे दौऱ्यावर

काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र; पत्रात म्हणाले...