जालन्यात हजारो आशा सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून सरकारचा निषेध नोंदवलाय. त्याचबरोबर कोरोनाच्या संपूर्ण कालावधीत आशा सेविकांनी आठ आठ तास ड्युटी बजावली आहे. मात्र राज्य सरकारकडून एकरुपयाही मानधन त्यांना मिळालं नाही. त्याचबरोबर संपूर्ण आशा सेविकांना फ्रंट लाईन वर्करचा दर्जा द्यावा या मागण्यांसाठी आशा सेविका बेमुदत संपावर आहेत.
मात्र आज संपाचा सातवा दिवस तरीही सरकारनं याची कोणतिही दखल घेतली नाही. त्यामुळं सरकारला जागं करण्यासाठी हजारोंच्या संख्येनं आशा सेविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निषेध व्यक्त केलाय.