Monsoon team lokshahi
महाराष्ट्र

यंदा मान्सून १० दिवस लवकर; कोकण-मुंबईत 'या' दिवशी होणार दाखल

Published by : Shweta Chavan-Zagade

सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे. लोक गरमीमुळे हैराण झाले असताना, यंदा मान्सून भारतात १० दिवस आधीच दाखल होण्याची शक्यता आहे. युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर पॉडकास्ट संस्थेकडून हा अंदाज वर्तविण्यात आला आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात झालेल्या वातावरणीय बदलांमुळे मान्सून (Monsoon) भारतात लवकर दाखल होणार असल्याचे सांगितले जाते. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात झालेल्या वातावरणीय बदलांमुळे मान्सून (Monsoon) भारतात लवकर दाखल होणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे लवकरच उष्णतेच्या तडाख्यातून नागरिकांची सुटका होणार आहे.

युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर'च्या अंदाजानुसार साधारण २० ते २१ मे रोजी मान्सून अंदमानात दाखल होईल. त्यानंतर २८ ते ३० मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होईल. गेल्यावर्षी केरळमध्ये १ जूनला मान्सूनचे आगमन होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, चक्रीवादळामुळे केरळमधील मान्सूनचे आगमन ३ जूनपर्यंत लांबणीवर पडले होते. त्यामुळे आतादेखील सर्व परिस्थिती सुरळीत राहिल्यासच मान्सून २८ मे पर्यंत केरळमध्य दाखल होईल. त्यानंतर मान्सून भारताच्या इतर भागांच्या दिशेने वाटचाल करण्यास सुरुवात करणार आहे.

जूनच्या मध्यापर्यंत मॉन्सूनच्या प्रगतीमुळे संपूर्ण महाराष्ट्र, दक्षिण गुजरात, मध्य आणि दक्षिण मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि दक्षिण ओडिशाचा काही भाग व्यापला जाईल. इतकंच नाहीतर हिमालयीय पश्चिम बंगालमध्येही मान्सूनचा पाऊस पडेल. जुलैच्या मध्यापर्यंत मान्सून संपूर्ण देशात हजेरी लावेल. दरम्यान, येणारा पावसाळा सलग देशभरात समाधानकारक असेल, असा अंदाज 'स्कायमेट वेदर' या हवामान अंदाज वर्तवणाऱ्या खासगी संस्थेच्या माध्यमातून वर्तवण्यात आला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची 6 नोव्हेंबरला मुंबईत सभा

Satara: जिल्ह्यात 215 जणांचे अर्ज; चुरस वाढली

राजकीय पक्षांना बंडखोरीचं ग्रहण; नाराजांकडून थेट अपक्ष अर्ज

नवी मुंबईच्या खारघरमधून 27 लाखांचं ड्रग्ज जप्त

Salman Khan : अभिनेता सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी