महाराष्ट्र

‘युनियन मुक्त एसटी कर्मचारी’, गोपिचंद पडळकरांचा हा नारा

Published by : Lokshahi News

एसटी कर्मचाऱ्यांचे पगार व इतर देय रकमा गेल्या काही दिवसांपासून प्रलंबित आहेत, याच प्रश्नावर आता आमदार गोपीचंद पडळकर यांनी आवाज उठवला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ द्या, अन्यथा संघर्ष अटळ असल्याचा इशारा आमदार पडळकर यांनी राज्य शासनाला दिला आहे. राज्यातील एसटी कर्मचारी तुपाशी व्हायचा असेल तर "युनियन मुक्त कर्मचारी" या घोषवाक्याचा नारा भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांनी दिला.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुविधा आहेत त्याच एसटी कामगारांना द्या, अन्यथा अन्यथा संघर्ष अटळ आहे, असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला दिला आहे. तसेच राज्याच्या अनेक एसटी कर्मचारी संघटना यांच्याकडून कोट्यावधी रुपयांचे ही एसटी कर्मचाऱ्यांच्या कडून घेतली जाते आणि युनियनचे पदाधिकाऱ्यांची मुले परदेशी शिक्षण घेतात आणि कर्मचारी मात्र आज उपाशी राहत आहे, त्यामुळे यापुढच्या काळात युनियन मुक्त कर्मचारी हा आपला नारा हे पडळकर यांनी स्पष्ट केले आहे.

सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी युनियनच्या सभासदत्वाचा राजीनामा देऊन एसटी कामगार युनियनची फलक फेकून देण्याचा आवाहन,आमदार पडळकर यांनी केला आहे. मोठ्या विश्वासाने महाराष्ट्रातील प्रवासी आजही एसटीने प्रवास करतात. पण आपल्या सेवेने एसटी महामंडळाला मोठं करणाऱ्या मराठी कर्मचाऱ्यांवरच आत्महत्येची ही वेळ यावी. ही राग आणणारी आणि अपमान करणारी बाब आहे. एकतर तुटपुंजा पगार तोही वेळेत मिळत नाही. ठाकरे सरकार सत्तेत येऊन दोन वर्ष उलटत आली पण कर्मचाऱ्यांचे वेतन करार अजून झाले नाहीत, असे देखील गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती