आज एक जुलैपासून अनेक महत्त्वाचे बदल झाले आहेत.. जाणून घेऊयात कोणते बदल झाले आहेत.
- सर्वसामान्यांसाठी महत्त्वाचा बदल म्हणजे आजपासून अमूल दूध दरात 2 रुपयांची वाढ
- प्लॅटफॉर्म तिकीट 50 वरून 10 रुपयांवर
- घरगुती सिलिंडर 25 रुपयांनी महागला
- पिंपरी चिंचवड शहरात पे अँड पार्क योजना आजपासून लागु करण्यात आलाय.
- पुणे रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या 10 रेल्वे गाड्या आजपासून पूर्ववत..यात इंद्रायणी एक्सप्रेस, पुणे नागपूर एक्सप्रेस, पुणे-अजनी एकस्प्रेससह अनेक महत्त्वाच्या गाड्यांचा समावेश
- सिंडिकेट बँकेचं कॅनरा बँकेत विलीनीकरण झाल्यामुळे बँकेचा IFSC कोड आजपासून बदलणार आहे
6 गेल्या आर्थिक वर्षासाठी इन्कम टॅक्स रिटर्न न भरणाऱ्यांना 1 जुलैपासून जादा TDS, TCS कर भरावा लागणार आहे. वार्षिक टीडीएस 50 हजार रुपयांपेक्षा जास्त असणाऱ्यांना हा नियम लागू होईल. - स्टेट बँक ऑफ इंडिया, अॅक्सिस बँक आणि सिंडिकेट बँक या प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या ग्राहकांसाठी काही महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. एसबीआयने एटीएममधून पैसे काढणे, चेक स्लिप आणि सेविंग्स बैंक डिपॉजिट खात्यांसाठी काही बदल केले आहेत, ते १ जुलैपासून लागू होतील.