महाराष्ट्र

रायगडात पर्यटनाच्या निमित्ताने येऊन चोरी करायचे, दोघांच्या आवळल्या मुसक्या

Published by : Lokshahi News

भारत गोरेगावकर, रायगड | रायगडात पर्यटनाच्या उद्देशाने येऊन चोऱ्या करणाऱ्या चार जणांपैकी दोन जणांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे पथकाला मुसक्या आवळण्यात यश आले आहे. या दोघांकडून 11 लाख 8 हजार 350 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत केले आहे.

रायगडात इरफान रसूल शेख (30) आणि ऐलानसिंग श्यामसिग कल्याणी (31) दोन्ही अट्टल चोरांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेले हे आरोपी अट्टल गुन्हेगार असून 15 ते 20 गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. या आरोपींनी खोपोली, रसायनी, नेरळ पोलीस ठाणे हद्दीत नऊ गुन्हे केले आहेत. हे सर्व गुन्हे उघडकीस आले असून 11 लाख 8 हजार 350 रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम हस्तगत केली आहे.

इरफान रसूल याला न्यायालयीन कोठडी मिळाली असून ऐलानसिंग हा गुरुवार पर्यत पोलीस कोठडीत आहे.
या अट्टल चोराचे दोन साथीदार रावीसिंग कल्याणी आणि लखनसिग दुधाणी हे पुणे पोलिसांच्या ताब्यात आहेत.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती