महाराष्ट्र

Nawab Malik | वक्फ बोर्डात कुठलाही घोटाळा झाला नाही

Published by : Lokshahi News

मंत्री नवाब मलिक यांच्या मंत्रालयांतर्गत येणाऱ्या वक्फ बोर्डाशी संबंधित ७ ठिकाणी शोध सुरू असल्याचे वृत्त समोर आले होते. या वृत्तावर आता नवाब मलिक यांनी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न ईडीद्वारे सुरू असल्याचा आरोप केला. त्याचबरोबर वक्फ बोर्डात कुठलाही घोटाळा झाला नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिेले आहे.

मंत्री नवाब मलिक यांच्या मंत्रालयांतर्गत येणाऱ्या वक्फ बोर्डाशी संबंधित पुणे घोटाळ्याची ईडीने चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणी ईडीने ईसीआयआर नोंदवला आहे. वक्फच्या एकूण ७ ठिकाणी शोध सुरू असल्याचे वृत्त आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी हे छापे टाकण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. वक्फ जमीन प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांच्या एफआयआरच्या आधारे हा तपास सुरू करण्यात आल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले.

या प्रकारानंतर नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोपांवर भाष्य केले. "वक्फ बोर्डाच्या कार्यालयावर छापे पडले नाही आहेत. वक्फ बोर्डाचे काम पार्दशकपणे सुरू आहे. मात्र जी छापेमारी सुरू आहे ती ताबूत इनाम इंडोमेंट बोर्ड ट्रस्ट वर आहे. मी ईडीला या एका ट्रस्टची नाही तर वक्फच्या नोंद असलेल्या ३० हजार संस्थेची माहिती देतो, त्यांनी चौकशी करावी. आमच्या पार्दशक कामत ईडीचा सहयोग मिळत आहे. त्यामुळे त्यांचे स्वागत आहे.काही वृत्तानुसार ईडी नवाब मलिकांच्या घरापर्यंत येईल, असे ऐकले. ईडी माझ्या घरापर्यंत आली तर त्यांचे स्वागत करेन.

Raj Thackeray: ‘परत राजकारणात येणार नाही’, लाऊडस्पीकरबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले...

काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या आज महाराष्ट्रात सभा

Bacchu Kadu | देवेंद्र फडणवीस आणि रवी राणा यांचा फेव्हिकॉलचा जोड : बच्चू कडू | Lokshahi News

Kasba Vidhan Sabha | सत्ताधारी पक्षाकडून धमक्या, मनसेचे उमेदवार गणेश भोकरे यांचा आरोप | Lokshahi

Ajit Pawar on Yugendra Pawar : साडेसहा लाख कोटींवर किती शून्य असतात हे तरी माहित आहे का? अजित दादांचा उपरोधिक टोला