महाराष्ट्र

प्रतापगड रस्त्यावर कोसळलेली दरड हटवली, बंद रस्ता पुन्हा केला सुरू

किल्ले प्रतापगडकडे जाणारी सर्व वाहतूक बंद करण्यात आली होती. लोकशाहीच्या बातमीनंतर दरड हटवण्याचे काम बांधकाम विभाग प्रशासनाच्या वतीने युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.

Published by : Shweta Chavan-Zagade

प्रशांत जगताप | सातारा : महाबळेश्वरहून प्रतापगडला जाणाऱ्या रस्त्यावर सोंडेच्या वळणावर मागील काही दिवस सुरू असणाऱ्या संततधार पावसामुळे आज (6 july) सकाळी दरड कोसळली. यामुळे कुंभरोशी हुन प्रतापगडला जाणारा रस्ता बंद झाला होता. त्यामुळे किल्ले प्रतापगडकडे जाणारी सर्व वाहतूक बंद करण्यात आली होती. लोकशाहीच्या बातमीनंतर दरड हटवण्याचे काम बांधकाम विभाग प्रशासनाच्या वतीने युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. 2 तासांत पडलेली महाकाय दरड जेसीबीच्या साहाय्याने हटवून मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

मागील काही दिवस या परिसरात सततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे डोंगर उतारावर दरडी कोसळण्याची शक्यता प्रशासनाने या अगोदरच व्यक्त केली आहे. त्याप्रमाणे स्थानिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आज सकाळी महाबळेश्वर प्रतापगड रस्त्यावर दरड कोसळली. यामुळे कुंभरोशीहून प्रतापगडला जाणारा रस्ता बंद झाला, याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व महसूल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. साडेदहा अकराच्या दरम्यान यंत्रणेच्या माध्यमातून प्रतापगडकडे जाणारा रस्ता रस्त्यावरील दरड हटवून खुला करण्यात आला.

या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. ज्या परिसरात दरड कोसळली त्या ठिकाणी लोक वस्ती नाही. त्यामुळे कोणतेही जीविताचे व शेती नुकसान झाले नाही. अफजल खान कबरीपासून दीड किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. दरड हटवून रस्ता खुला करण्यात आला असून कुंभरोशी हुन प्रतापगड कडे वाहतूक एका बाजूने सुरु करण्यात आली आहे.दरड हटविण्याचे काम दिवसभर सुरुच राहणार आहे. मंगळवारी दिवसभर या भागात जोरदार पाऊस पडला असून डोंगर कपारे निसरटे झाले आहेत. वाहन चालकांनी काळजीपूर्वक वाहन चालवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने दरड हटविण्यास अडथळा निर्माण होत होता.

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड