भुसावळ रेल्वे स्थानकावर शनिवारी आतंकवादी शिरले असून एका बेवारस बॅग मध्ये बॉम्ब सदुश्य वस्तू असल्याची माहिती भुसावळ पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाल्यानंतर अवघ्या काही मिनिटात भुसावळ रेल्वे स्थानकाला पोलीस छावणीचे रूप प्राप्त झाले . आतंकवाद्यांनी ओलीस धरून ठेवलेल्या नागरिकांची पोलिसांनी सुटका करून आतंकवाद्यांना अटक करत बॉम्ब सदृश्य वस्तू चा शोध घेतला. हा सर्व थरार पाहतांना प्रवासी देखील काही मिनिटांसाठी स्तब्ध झाले होते मात्र पोलिसांचे प्रसंगावधान तपासणीसाठी मॉक ड्रिल असल्याचे कळाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
सुरक्षा व्यवस्था तसेच अनुचित प्रकार घडल्यास पोलिस दल सज्ज आहे का यासाठी जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या आदेशानुसार भुसावळ रेल्वे स्थानकावर मॉकड्रिल घेण्यात आले. यादरम्यान भुसावळ पोलीस नियंत्रण कक्षात दहशतवादी शिरल्याची माहिती देत बॉम्ब सदृश्य वस्तू स्टेशन परिसरात ठेवण्यात आल्याचीही माहिती देण्यात आली. त्यानुसार भुसावळ शहरातील चारही पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी यांच्यासह शीघ्र कृती दल व बॉम्बशोधक पथक दाखल झाले. सर्वप्रथम शीघ्र कृती दलाने दहशतवाद्यांनी येथे नागरिकांना ओलीस ठेवले त्याची माहिती घेतली व त्यानंतर शिस्तबद्ध नागरिकांची सुटका करून रेल्वे स्टेशनच्या पार्किंग मध्ये ठेवलेली बेवारस बॅग तपासून त्यामध्ये असलेले बॉम्ब सदृश्य वस्तू डिफ्युज करण्यात आली.mock drill