Uddhav Thackeray & Eknath Shinde on Dasara Melava 2022 Team Lokshahi
महाराष्ट्र

महापालिकेने शिवाजी पार्क मैदानावर मेळाव्यासाठीचे दोन्ही गटाचे अर्ज फेटाळले

मुंबई महानगर पालिकेकडे शिंदेगट व उद्धव ठाकरे गट या दोन्ही गटांनी केलेले अर्ज पालिकेने फेटाळले आहेत.

Published by : Vikrant Shinde

महाराष्ट्रात शिवसेना पक्षामध्ये बंडखोरी झाल्यानंतर सत्तापालट झाला. तेव्हापासूनच राज्यातील राजकीय क्षेत्रात उलथापालथ सुरू आहे. शिवसेनेतून बाहेर पडेलेले आमदार, खासदार यांचा गट शिवसेना आपली असल्याचा दावा करत आहे तर, उद्धव ठाकरे हे शिवसेना आपली असल्याचं वारंवार सांगत आहेत. सध्या खरी शिवसेना कोणाची हा वाद न्यायालयात आहे. अद्याप शिवसेना कुणाची यावर न्यायालयाकडून निर्णय आलेला नाही. सध्या राज्यात शिवसेनेची परंपरा असलेला व शिवसैनिक वर्षभर ज्याची आतुरतेने वाट पाहतात असा दसरा मेळावा यंदा कोण घेणार यावर वाद सुरू आहे. शिंदेगट व उद्धव ठाकरे गट या दोन्ही गटांनी केलेले अर्ज पालिकेने फेटाळले आहेत.

दोन्ही गटांनी केला होता अर्ज:

दादरमधील शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थ येथे कोणताही सार्वजनिक कार्यक्रम करण्यासाठी मुंबई महानगर पालिकेकडून परवानगी घ्यावी लागते. त्याच पार्श्वभुमीवर आधी उद्धव ठाकरे गट व नंतर शिंदेगटाने पालिकेकडे अर्ज केले होते. या दोन्ही गटांचे अर्ज आता पालिकेने फेटाळली आहे.

का फेटाळले अर्ज?

राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कोणत्याही एका गटाला परवानगी दिल्यास राज्यात विशेषत: मुंबईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असं म्हणत महानगर पालिकेने दोन्ही गटांचे अर्ज फेटळण्यात आले आहेत.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय