राज्य सरकारनं बारावीच्या निकालासाठी दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाचे गुण ग्राह्य धरण्याचा निर्णय घेला आहे. दहावी साठी 30 टक्के, अकरावी साठी 30 टक्के आणि बारावीसाठी 40 टक्के अशी विभागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून या सूत्रानुसार मूल्यमापन करण्याचे आदेश महाविद्यालयांना देण्यात येतील. बारावी निकालासंदर्भात जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार बारावीच्या अंतर्गत मूल्यमापनाला सर्वाधिक वेटेज दिलं गेलं आहे. बारावी निकाल जाहीर करण्यासाठी महाविद्यायांना या शासन निर्णयाचा आधार घ्यावा लागणार आहे.
दहावीचे 30, अकरावीचे 30 आणि बारावीचे 40 टक्के गुण ग्राह्य धरणार आहेत. बारावी निकालाचे मूल्यांकन CBSE च्या धर्तीवर केलं जाणार आहे. 10 वी मध्ये सर्वाधिक गुण मिळालेल्या 3 विषयांचे 30 टक्के सरासरी गुण ,इयत्ता 11 वी च्या वार्षिक मूल्यमापनातील विषयनिहाय 30 टक्के गुण आणि इयत्ता 12 वी च्या वर्षभरातील अंतर्गत मूल्यमाप्नातील प्रथम सत्र, सराव परीक्षा, सराव चाचण्या, तत्सम मूल्यमापन यातील विषय निहाय 40 टक्के गुण. असे एकूण 100 टक्के गुणांच मूलपमापन केलं जाईल.