मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल राष्ट्रीय उद्यानाअंतर्गत येणाऱ्या हरीसाल वनपरिक्षेत्रातील आरएफओ दीपाली चव्हाण यांना 'लेडी सिंघम' म्हणून ओळखले जायचे. त्यांनी काल सायंकाळी आपल्या शासकीय निवासस्थानी गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिसांना सुसाईड नोट मिळाली असून अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्यांनी त्यात म्हटले आहे. आता हे प्रकरण अजूनच तापत चालेले आहे. वनक्षेत्र संचालक रेड्डी व dfo प्रमोद शिवकुमार यांच्यावरही गुन्हे दाखल करा या मागणीसाठी शवविच्छेदन गृहाबाहेर दीपाली चव्हाण यांच्या कुटुंबीयांचे आंदोलन सुरू केले आहे.
अमरावतीच्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव परिसरातील हरिसाल रेंज च्या RFO दिपाली चव्हाण यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून काल सायंकाळी साडे सात वाजता आत्महत्या केली. त्यानंतर दिपाली यांना शवविच्छेदनासाठी अमरावती येथे आणले असता वनक्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी व प्रमोद शिवकुमार यांच्यावर जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही व त्यांना अटक होत नाही तोपर्यंत दीपाली चव्हाण यांचा मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही अशी भूमिका व्यक्त करत दीपाली चव्हाण यांचे कुटुंबीयांनी घेतली आहे.
काही वनक्षेत्र कर्मचारी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवविच्छेदन गुलाब आहेर ठिय्या मांडून बसले आहे. तर dfo विनोद शिवकुमार यांना नागपूर येथून 5 अटक करण्यात आली आहे तर आता मुख्य वनरक्षक रेड्डी यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करण्यात यावे व त्यांना सुद्धा अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे, कारण रेड्डी यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले असा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
काय लिहले आहे दीपालीच्या सुसाईड नोटमध्ये ?
DFO विनोद शिवकुमार हे आपल्याला गावकरी व कर्मचाऱ्या समोर अश्लील शिवीगाळ करतात,रात्री बेरात्री भेटायला बोलावतात त्यांची मनाप्रमाणे न वागल्याने ते वारंवार सस्पेंड करण्याची धमकी देत असल्याचे लिहिले आहे.यापूर्वी शिवकुमार यांची रेड्डी यांच्या कडे तक्रार केली मात्र त्यांनी कुठलीच कारवाई केली नसल्याचं उल्लेख या सुसाईड नोट मध्ये आहे.
दिपाली चव्हाण यांना शिवकुमार यांनी ट्रेक ला बोलावले आपण प्रेग्नंट असल्याने ट्रेक करू शकली तरी मुद्दामुन ३ दिवस मालुर च्या कच्या रस्त्याने फिरविले यामुळे आपला गर्भपात झाल्याचा गंभीर आरोप देखील या नोट मध्ये करण्यात आला. काम केल्या नंतरही अनेक बिल काढली नसल्याचा देखील उल्लेख त्यांनी केला.या आत्महत्ये मुळे वन विभागात चांगलीच खळबळ उडाली असून, दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी करण्याची मागणी महाराष्ट्र रेंजर फॉरेस्ट असोसिएशन तसेच शिव सेना संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी यांनी केली आहे.