राज्याच्या विधानसभेला मागील साधारण 1 वर्षापासून अध्यक्षपदी कोणीही व्यक्ती लाभलेली नाही. याचं मुख्य कारण म्हणजे, राज्यपाल व सत्ताधारी अर्थात महाविकास आघाडी यांच्यातील वाद. दरम्यान, याच वादामुळे अध्यक्षपदाची निवडणूक आणखी एकदा पुढे ढकलली गेली आहे.
दरम्यान, राज्य सरकार अध्यक्षपदाच्या निवडणूकीसाठी आग्रही असले तरीही 'कोर्टात निवडणुकीबाबत याचिका प्रलंबित असल्याचं निवडणूक घेण्याबाबतचा प्रस्ताव राज्यपालांनी फेटाळला होता'. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस आहे. तर, न्यायालयात पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे. त्यामुळे ह्या अधिवेशनातही अध्यक्षपदाची निवडणूक होऊ शकणार नाही हे निश्चित. त्यामुळे, राज्यसरकार व राज्यपालांच्या वादात महाराष्ट्राला विधानसभेच्या अध्यक्ष पाहण्यासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार.