महाराष्ट्र

चप्पल जोडे शिवणाऱ्याची मुलगी आता होणार पोलीस उपनिरीक्षक

कोणतेही शिकवणी वर्ग न लावता तरुणीने यश संपादन केले. अर्जुनी मोरगाव येथे नागरिकांनी केला आनंद व्यक्त केला आहे

Published by : Shweta Shigvan-Kavankar

उदय चक्रधर | गोंदिया : जीवनात कोणत्याही ध्येय प्राप्तीसाठी मनात प्रचंड आत्मविश्वास, जिद्द असणे आवश्यक आहे. दारिद्र्यात जीवन जगणाऱ्या खुशबू प्रल्हाद बरैय्या या 25 वर्षीय युवतीने स्पर्धात्मक परीक्षेचे कोणत्याही क्लासेस शिवाय गावामध्ये राहून अवांतर अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. तिच्या अथक परिश्रमाला यश आले असून चप्पल-जोडे शिवणाऱ्याची मुलगी खुशबू आता पोलिस उपनिरीक्षक होणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट 'ब' मुख्य परीक्षा 2020 अंतर्गत पोलिस उपनिरीक्षकपदाची यादी जाहीर करण्यात आली. त्यात गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील खुशबू प्रल्हाद बरैय्या या युवतीने 364 गुण मिळवून पोलिस उपनिरीक्षक पदावर आपले स्थान निश्चित केले. खुबशूच्या या असामान्य यशाबद्दल तिचे कौतुक केले जात आहे.

खुशबूचे वडील प्रल्हाद बरैय्या हे अर्जुनी शहराच्या ठिकाणी लहानसे दुकान थाटून चप्पल, जोडे शिवण्याचे काम करतात. दोन खोल्यांच्या घरात पत्नी, एक मुलगा, दोन मुली यांच्यासह राहतात. आपल्या कुटुंबाचा गाडा चालवितात. प्रल्हाद त्यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले. पत्नी आजारी असूनही मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. शिक्षणापासून प्रगती नाही याची जाण त्यांना वेळोवेळी होत असल्याने त्यांनी तिन्ही मुलांच्या शिक्षणात कोणतीही उणीव भासू दिली नाही. आपले मुले शिक्षण घेऊन शासकीय पदावर कार्यरत राहावे, अशी त्यांची अपेक्षा होती.

घरामध्ये अभ्यासासाठी सोय नसताना सुद्धा 'खुशबू'ने स्वत: कष्ट करून, त्रास भोगून स्पर्धात्मक परीक्षेचे कोणतेही वर्ग न लावता एमपीएससीसाठी शहरात जाऊन अभ्यास वर्गाचा आग्रह केला नाही. सरकारी नोकरी करायची हा एकच ध्यास मनामध्ये अंगिकारून नियमित अभ्यास, अवांतर वाचनाने यश संपादन केले. अर्जुनी मोरगाव पोलीस स्टेशनच्या वाचनालयात खुशबूने आपले यशस्वी भविष्य घडविले. असा संघर्ष करत तिने एमपीएससी परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले.

Amount Seized From Bhiwandi: भिवंडीत एटीएम बँकेत तब्बल दोन कोटी तीस लाखांची रोकड जप्त

Prakash Ambedkar On Jarange Patil: प्रकाश आंबेडकरांचं जरांगेंना आवाहन, म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून

मविआकडून लाडकी बहीण योजनेला काऊंटर करणारी घोषणा?

Anushka Sharma Post On Virat Kohli HBD: विराटच्या वाढदिवसानिमित्त अनुष्काची खास पोस्ट