sharad pawar Team Lokshahi
महाराष्ट्र

भाजपपाठोपाठ राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराचाही अर्ज मागे

विधान परिषदेची निवडणूक 20 जूनला

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यसभेनंतर आता विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून आज अर्ज मागे घेण्यासाठी शेवटचा दिवस आहे. भाजपने, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही विधानपरिषदेसाठी अतिरीक्त उमेदवार जाहीर केला होता. यामुळे विधानसभेत भाजप, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस अमने-सामने येण्याची चिन्हे होती. परंतु, भाजपपाठोपाठ राष्ट्रवादीच्या उमेदवारांनीही आपला अर्ज मागे घेतला आहे. यामुळे विधानसभा बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने रयतक्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली होती. तर राष्ट्रवादीकडून शिवाजीराव गर्जे यांनी डमी अर्ज भरला होता. तर कॉंग्रेसनेही एक उमेदवार दिला होता. यामुळे विधानपरिषद निवडणुकीतही महाविकास आघाडी विरुध्द भाजप सामना रंगणार होता. परंतु, सदाभाऊ खोत यांच्यासह शिवाजीराव गर्जे यांनीही उमेदवारी मागे घेतली आहे. परंतु, कॉंग्रेसच्या उमेदवाराने अद्याप अर्ज मागे न घेतल्याने निवडणूक संघर्ष अटळ आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी