संजय देसाई, सांगली | दक्षिण आफ्रिकेतून सांगली आलेल्या त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या व्यक्तीची ओमायक्रॉन टेस्ट करून नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र रीपोर्ट समोर येण्याआधीच त्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान आता नेमका त्याचा रीपोर्ट काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पूर्व आफ्रिकेच्या मलावी देशातून मृत व्यक्ती भारतात आला होता. केनिया-दोहा- मुंबई आणि जत असा प्रवास करत ते सांगलीत दाखल झाले होते. दरम्यान आठ दिवसांपूर्वी प्रकृती गंभीर बनल्याने त्यांच्यावर मिरज शासकीय कोरोना रुग्णालयात उपचार सुरू होते. या व्यक्तीची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती.मात्र अद्याप ओमायक्रॉन टेस्ट बाकी होती.
बुधवारी सदर व्यक्तीची ओमायक्रॉन टेस्ट करण्यासाठी नमुने पाठवण्यात आले होते. आता फक्त रीपोर्टची प्रतिक्षा होती.मात्र रीपोर्ट समोर येण्याआधीच सदर व्यक्तीवर मृत्यु ओढवला आहे. त्यामुळे सांगलीची धाकधूक वाढली आहे. दरम्यान आता नेमका त्याचा रीपोर्ट काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.