तुषार झरकेर | टीईटी परीक्षा पेपरफुटीत अटक करण्यात आलेल्या परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्याकडून आज पून्हा 10 लाख रुपये हस्तगत करण्यात आलं आहे. त्यामुळे आतापर्यंत सुपे यांच्याकडून 2 कोटी 57 लाख रुपये हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती सायबर पोलीस स्टेशनचे डीसीपी भाग्यश्री नवटके यांनी दिली.
शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहाराप्रकरणी पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपेंच्या घरावर दुसऱ्यांदा धाड टाकली. त्यात पोलिसांनी जवळपास दोन कोटींचं घबाड जप्त केलं. सुपेंच्या घरातून 1 कोटी 58 लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने हस्तगत केल्याची माहिती मिळतेय. याआधी झालेल्या धाडीत पोलिसांनी 90 लाखांचं घबाड हस्तगत केलं होतं. पण पुन्हा पोलिसांचा छापा पडण्याच्या भीतीनं सुपेंच्या पत्नी आणि मेहुण्यानं रक्कम आणि दागिने दुसरीकडे लपवले. पण पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर रोख रकमेसह ऐवज पोलिसांच्या हाती लागले.
दरम्यान आता ज्या व्यक्तीकडे सुपे यांनी पैसे ठेवले होते त्याच व्यक्तीने स्वतः हुन 10 लाख रुपये सायबर पोलिसांकडे आणून दिले आहे.आता पर्यंत सुपे यांच्याकडून 2 कोटी 57 लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहे.अशी माहिती सायबर पोलीस स्टेशनचे डीसीपी भाग्यश्री नवटके यांनी दिली आहे.