महाराष्ट्र

२६/११ सारखा घातक हल्ला करणार; मुंबई पोलिस ट्रॅफिक कंट्रोलला धमकीचा मेसेज

सणासुदीच्या काळात मुंबईवर दहशवादाचे सावट निर्माण झाले आहे. राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : सणासुदीच्या काळात मुंबईवर दहशवादाचे सावट निर्माण झाले आहे. मुंबईत 26/11 सारखा हल्ला करणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिस ट्रॅफिक कंट्रोल रुमला हा धमकीचा मेसेज आला आहे. राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई पोलिस ट्रॅफिक कंट्रोल रुमला धमकीचा मेसेज आला असून २६/११ सारखा घातक हल्ला करणार असल्याची धमकी दिली आहे. कंट्रोल रुमच्या व्हॉट्स अॅप नंबरवर पाकिस्तानमधून धमकी वजा मेसेज आला आहे. याशिवाय या हल्यात भारतात असलेल्या ६ जणांची मदत घेणार असल्याची माहितीही स्पष्ट केली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला असून राज्यभरात हायअलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, काहीच दिवसांपुर्वी हरिहरेश्वर किनाऱ्यावर संशयास्पद बोट आढळून आली होती. या बोटीची तपासणी केली असता यामध्ये AK 47 बंदुका आढळून आल्या होत्या. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले होते. परंतु, आता मुंबई कंट्रोल रुमला धमकीचा मेसेज आल्याने पुन्हा एकदा पोलिसांनी मुंबईत बंदोबस्त वाढवला असून खबरदारी घेतली जात आहे.

नरेश अरोरा यांचा Ajit Pawar यांच्या खांद्यावर हात, Amol Mitkari भडकले; थेट म्हणाले...

Ramdas Athawale on Eknath Shinde: ...तर एकनाथ शिंदेंना दिल्लीला बोलवा, रामदास आठवलेंची मागणी काय?

SC Rejects Petition against EVM | हारलं की EVMमध्ये छेडछाड दिसते-SC, Arvind Sawant यांची प्रतिक्रिया

Aaditya Thackeray : 'महायुतीचा मुख्यमंत्री नक्की कोण होतोय?'आदित्य ठाकरेंचा महायुतीला सवाल

Latest Marathi News Updates live: ईव्हिम मशीनला विरोध करणारी याचिका सुप्रिम कोर्टाने फेटाळली