महाराष्ट्र

अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील भीषण अपघात, दोघांचा मृत्यू तर १४ जण जखमी

तिवसा ते कुऱ्हा मार्गावर रात्री ७ वाजताच्या सुमारास वाठोडा गाव नजीक भरधाव टँकरने ऑटो व दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना

Published by : Sagar Pradhan

सूरज दाहाट|अमरावती: तिवसा ते कुऱ्हा मार्गावर रात्री ७ वाजताच्या सुमारास वाठोडा गाव नजीक भरधाव टँकरने ऑटो व दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली हा अपघात इतका विचित्र होता की यामध्ये दोन जणाचा मृत्यू झाला तर १४ जण गंभीर जखमी असून जखमीमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे.

प्राप्त माहितीनुसार तिवस्यावरून कुऱ्हा मार्गे जाणारा एम.एच 46-1505 क्रमांकाचा भरधाव ट्रकने कुऱ्हा वरून प्रवासी घेऊन येणाऱ्या ऑटो क्रमांक एम.एच 27बीडब्लू 3833 व एम.एच 27डी.9543 क्रमांकाच्या दुचाकीला जबर धडक दिल्याने मोठा अपघात घडला या अपघातात घटनास्थळी दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला असून एकाचा अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती आहे तर यामध्ये एकूण 14जण जखमी असून 7 जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत,अपघातातील जखमीना तिवसा उपजिल्हा रुग्णालयात नंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात हळविण्यात आले असून जखमीमध्ये उमेश शिंदे, रा. मोझरी,शितल माटे,रा. जळका,रेखा वाघमारे, शे. बाजार,सिमा तेलंग,रोनक विशाल तेलंग,हिंगणघाट,श्रीकृष्ण वाघमारे,शे. बाजार,आरोही तेलंग,श्वेता शेंद्रे,विराट शेंद्रे,दीप्ती शेंद्रे,प्रांजली हेमंत गोरखेडे, ऋतुश्री गौरखेडे,सानवी गौरखेडे सर्व रा. तिवसा अशी जखमींची नावे आहेत,तर सोमा तापा कोरटकर वय.45, रा. घोटा, व कैलास वाघमारे, वय.50. रा.शे.बाजार असे मृतकाचे नावे आहेत,यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मदत कार्य केले,यावेळी रुग्णालयात माजी पंचायत समिती सदस्य योगेश लोखंडे, भाजप नेते राजेश वानखडे, तिवसा नगराध्यक्ष योगेश वानखडे, वणीचे सरपंच मुकुंद पुनसे, पंचायत समिती सदस्य अब्दुल सत्तार, रुग्णसेवक सुरज कुर्जेकर सह आदींनी मदत केली

NEWS PLANET With Vishal Patil | 'लाडकी बहीण' ठरणार गेमचेंजर? लाडक्या बहिणींची कुणाला साथ?

Nilesh Rane | Kokan Vidhansabha | कोकणात कुणाचं वारं? निलेश राणे Exclusive

Mumbai Vidhansabha Poll | मुंबईकरांचा कौल कोणाला? 'या' नेत्यांना मिळणार पराभवाचा धक्का ?

मणिपूरमध्ये आंदोलनाला आठवडाभर स्थगिती, ‘कोकोमी’चा निर्णय

'त्या' प्रकरणी अजित पवार यांना बारामती कोर्टाचे समन्स