पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षेचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता विद्यार्थ्यांना लागली होती. यासंदर्भात आता शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी तारीख जाहीर केली आहे. दहावीचा निकाल १७ जून रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे. हा निकाल आपणास लोकशाहीच्या वेबसाईटवर पाहता येणार आहे.
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी १ नंतर ऑनलाईन उपलब्ध होतील, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
असा पाहा निकाल :
कसा पाहाल निकाल?
स्टेप 1 : लिंकवर लॉन ऑन करा
स्टेप 2 : दहावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा
स्टेप 3 : तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपले सीट नंबर टाका
स्टेप 4 : तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा
स्टेप 5 : एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल
स्टेप 6 : निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा
राज्यातील 9 विभागीय मंडळामार्फत मार्च-एप्रिल 2022 ची दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल 2022 दरम्यान झाली. दहावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. सर्वाधिक नोंदणी हे नऊ विभागांपैकी मुंबई विभागातील आहे. मुंबई विभागात तीन लाख 73 हजार 840 विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेत नोंदणी केली आहे. ज्यामध्ये ठाणे जिल्ह्यात 1 लाख 24 हजार 122, पालघर जिल्ह्यात 61 हजार 866, रायगड जिल्हात 36 हजार 996, मुंबई पश्चिम 65 हजार 497, मुंबई उत्तर 51 हजार 868 आणि मुंबई दक्षिण 33 हजार 590 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे.