लॉकडाउनपासून बंद झालेली मंदिरे आणि प्रार्थनास्थळे आज, गुरुवारी नवरात्रीच्या मुहूर्तावर पुन्हा सामान्य नागरिकांसाठी खुली होत आहेत. सणाच्या दिवशी तरी मंदिरात जाऊन दर्शन घेता यावे यासाठी भाविक आतुर झाले होते. मात्र हे दर्शन करोनासंबंधी नियम पाळून घेता येणार आहे. त्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे मुंबई महापालिकेने जारी केली आहेत. त्याचपार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब मुंबा देवीचे दर्शन घेतले आहे. यावेळी मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील दर्शन घेतले आहे.
मुंबादेवीचे दर्शन घेण्यासाठी मंदिराच्या वेबसाईटवर ऑनलाईन बुकींग करुन भविकांना दर्शन दिले जाणार आहे. मुंबादेवी हे मुंबईकरांचे आराध्य दैवत आहे. त्यामुळे मुंबादेवी मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंदिरात रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे त्याचप्रमाणे मंदिर आणि पोलीस प्रशानाकडून मंदिरात आणि मंदिर बाहेरिल परिसरात कडेकोड बंदोबस्त करण्यात आला आहे.