देहू : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे (Sant Tukaram Maharaj) मंदिर उद्यापासून दर्शनासाठी बंद ठेवले जाणार असल्याचे सांगण्यात येत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) 14 जूनला देहूत येणार असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती मिळाली होती. परंतु, देहू मंदिर तीन दिवस नाही तर या फक्त १४ तारखेला दर्शनासाठी बंद राहणार असल्याचे स्पष्टीकरण देहू संस्थानने दिले आहे.
पंतप्रधान मोदी 14 जूनला देहूत येणार असल्याने संत तुकाराम महाराजांचे मंदिर उद्यापासून दर्शनासाठी बंद ठेवले जाणार असल्याचे सांगण्यात येत होते. सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला जाणार असून केंद्रीय सुरक्षा पथकाने देहू संस्थांनला तशा सूचना दिल्या होत्या. व त्याची अंमलबजावणी उद्यापासून केली जाणार होती. परंतु, या बातम्या माध्यमांवर प्रसारित होताच या निर्णयाचा सोशल मीडियावर विरोध करण्यात आला. भाविकांची गैरसोय आणि समाज माध्यमांवरील प्रतिक्रियांमुळे देहू संस्थांनाने निर्णय मागे घेतला आहे. आता देहू मंदिर तीन दिवस नाही तर या फक्त १४ तारखेला दर्शनासाठी बंद राहणार असल्याचे देहू संस्थानामार्फत सांगण्यात आले आहे.
देहू मंदिर तीन दिवस दर्शनासाठी बंद राहणार असल्याचा निर्णय देहू संस्थानने मागे घेतला. मंदिरातील साफसफाई असेपर्यंतच मंदिर दर्शनासाठी बंद असणार आहे, असे स्पष्टीकरण देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी दिले,
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जून रोजी देहूत दाखल होणार आहेत, त्यांचा हस्ते जगतगुरु संत तुकोबांच्या मूर्तीचा आणि शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे, त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात पंतप्रधान यांच्या स्वागताचे फलक लावले आहेत. यात भाजपाने लावलेल्या फलकावर पांडुरंगापेक्षा पंतप्रधान मोदींचा फोटो मोठा असून यावर आक्षेप घेत राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी आक्षेप घेतला आहे.