प्रशांत जव्हेरी, नंदुरबार | नंदुरबारच्या सारंगखेडा येथील तापी नदीवरील पुलाचा भराव खचल्याची घटना घडली आहे. पुलाचा भराव खचल्याने वाहतूक करणे धोक्याचे असल्याने एका साईडची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी दिली आहे.
अतिवृष्टीमुळे सारंगखेडा येथील टाकरखेडा गावाजवळ तापी नदीवरील पुलाचा भराव खचला आहे.भराव खचल्यामुळे पुलावरून जाणाऱ्या वाहनांना धोका निर्माण झाला आहे. पुलाची दयनीय अवस्था झाली असून मोठा अनर्थ घडल्यानंतर पुलाची दुरुस्ती करणार का असा प्रश्न गावकरी व वाहन धारकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान पुलाला असलेला भराव खचल्याने वाहतूक करणे धोक्याचे ठरत आहे. पूलाच्या एका साईडची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून पुलाचे दुरुस्तीचे काम करण्याचे आदेश देण्यात आले आहे असे जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी सांगितले.