धारावीकरांकडून अदानी कंपनीचे सर्वेक्षण बंद केल्याची माहिती मिळत आहे. मार्चपासून हे बांधकामांचे सर्वेक्षण सुरू केले होते. मात्र आता ते बंद करण्यात आले आहे.
धारावीकरांनी केलेल्या विरोधानंतर तूर्तास सर्वेक्षण बंद करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर आज वर्षा गायकवाड, खासदार अनिल देसाई प्रकल्प अधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे. अधिकाऱ्यांची भेट घेऊन ते धारावीकारांच्या मागण्या अधिकाऱ्यांसमोर मांडणार आहेत.