महाराष्ट्र

गडचिरोलीत 4 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Published by : Lokshahi News

गडचिरोली पोलिसांपुढे समोर लोकांच्या सुरक्षते बरोबरच नक्षलवाद हे महत्वाचे आव्हान आहे. यावर उपाय म्हणून शासनाने नक्षलवाद्यांना आत्मसमर्पणचा एका पर्याय दिला आहे. याचा पार्श्वभूमीवर चार नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून आत्मसमर्पित नक्षल्यांमध्ये 3 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. शासनाने या चौघांवर एकुण २२ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. दिनेश उर्फ दयाराम गंगर नैताम, नकुल उर्फ सुखालुराम डुमा मडावी, निला रूषी कुमरे, शरद उर्फ रमेश उर्फ गोविंदा सामजी आतला अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची नावे आहे.
गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे नक्षलविरोधी अभियान राबविल्यामुळे गेल्या 2 वर्षात आजपर्यंत एकुण ३७ माओवादयांनी आत्मसमर्पण केले असून, यात ०४ डिव्हीसी, ०२ दलम कमांडर, ०२ दलम उपकमांडर, २८ सदस्य, ०१ जनमिलीशिया यांचा समावेश आहे. विकासकामांना आडकाठी करणाऱ्या नक्षलवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असल्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी स्पष्ट केले आहे.

शासनाने जाहीर केलेली आत्मसमर्पण योजना, वर्षभरात विविध चकमकीत माओवाद्यांचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ नक्षली नेत्यांसह अनेक जहाल नक्षल्यानी आजपर्यंत आत्मसमर्पण केले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पितांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवुन आणल्यामुळे ही संख्या वाढत आहे.

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Lokshahi Marathi Live Update : महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे यांना जळगाव जिल्ह्यात विक्रमी मतदान

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...