राज्यात राजकीय गोंधळ सुरु असताना, आज महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटाला न्यायालयाने धक्का देत, निवडणूक आयोगाच्या दरबारी हा निर्णय घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे शिंदे गटात आनंदाचं वातावरण असताना. सर्वोच्च न्यायालयाने राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्दावरून शिंदे-फडणवीस सरकारला धक्का दिला आहे.
राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्ती करण्यास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे. राज्यपाल नियुक्त बारा आमदारांवर मागील सुनावणी प्रलंबित असताना नवे शिंदे-फडणवीस सरकार पुन्हा नव्याने बारा आमदारसाठी यादी तयार करणा असल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली आहे.
राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात न्यायालयात सुनावणी झाली. या प्रकरणी कोणतीही कारवाई सरकारने करू नये असे आदेश न्यायालयाने दिले. हा शिंदे सरकारसाठी मोठा धक्का मानला जातो.
महाविकास आघाडी सरकाने राज्यपालांनी विधान परिषदेवर १२ आमदारांची नियुक्त करावी, यासाठी पत्र दिले होते. मात्र, त्या पत्रावर राज्यपालांनी दीड वर्ष कोणताही निर्णय घेतला नव्हाता. त्यानंतर राज्यात सत्तातर झाल्यानंतर राज्यपालांनी महाविकास आघाडी सरकारने दिलेले पत्र फेटाळून लावले होते. त्यामुळे या न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्यपाल देखील आता अडचणीत आले असून त्यांना आमदारांच्या नियुक्त्या करता येणार नाही, हे आता स्पष्ट झालं आहे.